भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छदे ३३४ :
१.(विवक्षित कालावधीनंतर जागांचे आरक्षण व विशेष प्रतिनिधित्व समाप्त होणे 🙂
या भागाच्या पूर्वगामी तरतुदींमध्ये काहीही असले तरी,—-
(क) लोकसभेत व राज्यांच्या विधानसभेत अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांच्याकरिता जागांचे आरक्षण ; आणि
(ख) लोकसभेत व राज्यांच्या विधानसभेत आंग्लभारतीय समाजाला नामनिर्देशनाद्वारे प्रतिनिधित्व ;
यांच्याशी संबंधित असणाऱ्या या संविधानाच्या तरतुदी, या संविधानाच्या प्रारंभापासून २.(खंड (क) च्या बाबतीत एेंशी वर्षांचा आणि खंड (ख) च्या बाबतीत सत्तर वर्षांचा) कालावधी संपताच अंमलात असण्याचे बंद होईल :
परंतु असे की, या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे, लोकसभेतील किंवा राज्याच्या विधानसभेतील कोणत्याही प्रतिनिधित्वावर, त्यावेळी अस्तित्वात असलेल्या लोकसभेचे, किंवा यथास्थिति, विधानसभेचे विसर्जन होईपर्यंत परिणाम होणार नाही.
———-
१. संविधान (एकशे चारावी सुधारणा) अधिनियम २०१९ याच्या कलम २ द्वारे समास टिपेऐवजी (२५-१-२०२० पासून) समाविष्ट करण्यात आले.
२. संविधान (एकशे चारावी सुधारणा) अधिनियम २०१९ याच्या कलम २ द्वारे सत्तर वर्षाचा या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.