Constitution अनुच्छेद १२२ : न्यायालयांनी संसदेच्या कामकाजाबाबत चौकशी न करणे :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद १२२ :
न्यायालयांनी संसदेच्या कामकाजाबाबत चौकशी न करणे :
(१) कार्यपद्धतीत एखादी तथाकथित नियमबाह्य गोष्ट घडली आहे या कारणावरून संसदेतील कोणत्याही कामकाजाची विधिग्राह्यता प्रश्नास्पद करता येणार नाही.
(२) संसदेमधील कार्यपद्धतीचे किंवा कामकाज चालवण्याचे विनियमन करण्याचे अथवा संसदेत सुव्यवस्था राखण्याचे अधिकार या संविधानाद्वारे किंवा तद्न्वये ज्याच्या ठायी निहित करण्यात आले आहेत अशा, संसदेच्या कोणत्याही अधिकाऱ्याने किंवा सदस्याने त्या अधिकारांच्या केलेल्या वापराबाबत, तो कोणत्याही न्यायालयाच्या अधिकारितेस अधीन असणार नाही.

Leave a Reply