Constitution अनुच्छेद १०९: धन विधेयकांबाबत विशेष कार्यपद्धती :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद १०९:
धन विधेयकांबाबत विशेष कार्यपद्धती :
(१) धन विधेयक राज्यसभेत प्रस्तुत केले जाणार नाही.
(२) लोकसभेने धन विधेयक पारित केल्यानंतर, ते राज्यसभेकडे तिच्या शिफारशींकरता पाठवले जाईल आणि ते विधेयक मिळाल्याच्या दिनांकापासून चौदा दिवसांच्या कालावधीच्या आत, राज्यसभा आपल्या शिफारशींसह ते लोकसभेकडे परत पाठवील व तद्नंतर, लोकसभेला राज्यसभेच्या सर्व किंवा त्यांपैकी कोणत्याही शिफारशी स्वीकारता येतील किंवा फेटाळता येतील.
(३) जर लोकसभेने, राज्यसभेच्या शिफारशींपैकी कोणत्याही शिफारशी स्वीकारल्या तर, धन विधेयक, राज्यसभेने शिफारस केलेल्या व लोकसभेने स्वीकारलेल्या सुधारणांसह दोन्ही सभागृहांनी पारित केले असल्याचे मानले जाईल.
(४) जर लोकसभेने राज्यसभेच्या शिफारशींपैकी कोणत्याही शिफारशी स्वीकारल्या नाहीत तर, धन विधेयक, लोकसभेने जसे पारित केले होते तशाच स्वरूपात, राज्यसभेने शिफारस केलेल्यांपैकी कोणत्याही सुधारणेशिवाय ते दोन्ही सभागृहांनी पारित केले असल्याचे मानले जाईल.
(५) जर लोकसभेने पारित केलेले व राज्यसभेकडे तिच्या शिफारशींकरता पाठवलेले धन विधेयक, उक्त चौदा दिवसांच्या कालावधीच्या आत, लोकसभेकडे परत पाठविण्यात आले नाही तर, उक्त कालावधी संपल्यावर, ते लोकसभेने जसे पारित केले होते तशा स्वरूपात दोन्ही सभागृहांनी पारित केले असल्याचे मानले जाईल.

Leave a Reply