बाल कामगार अधिनियम १९८६
कलम ९ :
निरीक्षकाला नोटीस देणे :
१) एखाद्या आस्थापनेच्या संबंधात या अधिनियमाचा प्रारंभ होण्याच्या लगतपूर्वीच्या दिनांकास ज्या आस्थापनेमध्ये १.(किशोराला) कामावर ठेवलेले असेल किंवा काम करण्याची परवानगी दिलेली असेल तर, अशा आस्थापनेच्या संबंधातील प्रत्येक अधिनियंत्रक, ज्याच्या स्थानिक सीमांमध्ये अशी आस्थापना स्थित आहे आा निरीक्षकाला पुढील तपशीलाचा अंतर्भाव असलेली लेखी नोटीस पाठवील :-
(a)क)(अ) आस्थापनेचे नाव व जागा;
(b)ख)(ब) आस्थापनेचे प्रत्यक्ष व्यवस्थापन करणाऱ्या व्यक्तीचे नाव;
(c)ग)(क) ज्या पत्त्यावर आस्थापनेसंबंधातील पत्रव्यवहार केला पाहिजे तो पत्ता; आणि
(d)घ)(ड) आस्थापनेत चालणाऱ्या व्यवसायाचे किंवा प्रक्रियेचे स्वरुप.
२) ज्या एखाद्या आस्थापनेच्या संबंधात या अधिनियमाचा प्रारंभ झाल्याच्या दिनांकानंतर जो अधिनियंत्रक, त्या आस्थापनेच्या संबंधात १.(किशोराला) कामावर ठेवील किंवा काम करण्याची परवानगी देईल असा प्रत्येक अधिनियंत्रक, ज्याच्या स्थानिक सीमांमध्ये अशी आस्थापना स्थित आहे अशा निरीक्षकाला अशा रीतीने कामावर ठेवल्याच्या दिनांकापासून तीस दिवसांच्या आत पोटकलम (१) मध्ये नमूद केलेल्या तपशीलाचा अंतर्भाव असलेली लेखी नोटीस पाठवील.
स्पष्टीकरण :
पोटकलमे (१) व (२) यांच्या प्रयोजनार्थ, आस्थापनेच्या संबंधात या अधिनियमाच्या प्रारंभाचा दिनांक याचा अर्थ, अशा आस्थापनेच्या संबंधात हा अधिनियम अंमलात आणण्याचा दिनांक, असा आहे.
३) कलमे ७, ८, ९ यांमधील कोणतीही गोष्ट, अधिनियंत्रक, ज्या कोणत्याही आस्थापनेत आपल्या कुटुंबाच्या मदतीने कोणतीही प्रक्रिया चालवत असेल त्या आस्थापनेला किंवा शासनाकडून स्थापन करण्यात आलेल्या किंवा सहाय्य मिळत असलेल्या किंवा मान्यता मिळालेल्या कोणत्याही शाळेला लागू असणार नाही.
——-
१. २०१६ चा अधिनियम क्रमांक ३५ याच्या कलम १३ द्वारा बालक या ऐवजी समाविष्ट करण्यात आले.