Bsa कलम ९९ : दस्तऐवजाची भाषा अनेकांना लागू पडते तेव्हा त्यांपैकी कोणाला लागू पडते याचा पुरावा देता येतो:

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम ९९ :
दस्तऐवजाची भाषा अनेकांना लागू पडते तेव्हा त्यांपैकी कोणाला लागू पडते याचा पुरावा देता येतो:
जेव्हा वापरलेली भाषा अनेक व्यक्तींपैकी कोणाही एकाला लागू करण्याचे अभिप्रेत असण्याचा संभव असतो व एकीहून अधिकांना ती लागू करण्याचे अभिप्रेत असू शकणार नाही तेव्हा, त्यांपैकी कोणत्या व्यक्तीला किवा वस्तूला ती लागू करण्याचा उददेश होता हे दाखवून देणाऱ्या तथ्यांचा पुरावा देता येईल.
उदाहरणे :
(a) क) (ऐ) आपला पांढरा घोडा (बी) ला १००० रुपयाला विकण्याचा करार करतो. (ऐ) कडे दोन पांढरे घोडे आहेत. त्यांपैकी कोणता अभिप्रेत होता हे दाखवून देणाऱ्या तथ्यांचा पुरावा देता येईल.
(b) ख) (ऐ) हा (बी) बरोबर रामगढला जाण्याचा करार करतो. राजस्थानातील रामगढ अभिप्रेत होते की उत्तराखंडातील रामगढ अभिप्रेत होते हे दाखवून देणाऱ्या तथ्यांचा पुरावा देता येईल.

Leave a Reply