Bsa कलम ९३ : पाच वर्षापूर्वीचा जुन्या इलेक्ट्रॉनिक अभिलेखांकरता गृहितक :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम ९३ :
पाच वर्षापूर्वीचा जुन्या इलेक्ट्रॉनिक अभिलेखांकरता गृहितक :
जो अभिलेख पाच वर्षापूर्वीचा असल्याचे दिसते किंवा तसे शाबीत केले जाते असा एखादा इलेक्ट्रॉनिक अभिलेख एखाद्या विशिष्ट ताब्यातून हजर करण्यात आला असून त्या विशिष्ट प्रकरणी न्यायालयाला तो ताबा योग्य वाटला तर त्या अभिलेखावरील इलेक्ट्रॉनिक सही ज्या व्यक्तिची असल्याचे दिसते तिनेच ती अशाप्रकारे केली आहे किंवा तिने त्या बाबतीत प्राधिकृत केलेल्या कोणत्याही व्यक्तिने ती केली आहे असे न्यायालयाचा गृहीत धरता येईल.
कलम ८१ चे स्पष्टीकरण या कलमाला सुद्धा लागू आहे.

Leave a Reply