Bsa कलम ८८ : विदेशी न्यायिक अभिलेखाच्या प्रमाणित प्रती संदार्भात गृहीतक:

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम ८८ :
विदेशी न्यायिक अभिलेखाच्या प्रमाणित प्रती संदार्भात गृहीतक:
१) जो कोणताही दस्तऐवज भारताच्या बाहेर कोणत्याही देशाच्या कोणत्याही न्यायिक अभिलेखाची प्रमाणित प्रत असल्याचे दिसत असेल तो दस्तऐवज जर केंद्र शासनाचा जो कोणताही प्रतिनिधी अशा देशात किंवा अशा देशासाठी असेल त्याने न्यायिक अभिलेखांच्या प्रती प्रमाणित करण्यासाठी त्या देशात जी पद्धत सर्वसामान्यपणे प्रचारात आहे असे प्रमाणित केले असेल त्या पद्धतीने प्रमाणित करण्यात आला असल्याचे दिसत असेल तर, तो खरा व बिनचूक आहे असे न्यायालयाला गृहीत धरता येईल.
२) भारताच्या बाहेर कोणत्याही राज्य क्षेत्राच्या किंवा स्थलाच्या बाबत जो अधिकारी सर्वसाधारण वाक्खंड अधिनियम, १८९७ (१८९७ चा १०) कलम ३ च्या खंड (४३) मधील व्याख्येप्रमाणे त्या क्षेत्राचा किंवा स्थळाचा राजनैतिक प्रतिनिधी असेल तो ते क्षेत्र किंवा स्थळ समाविष्ट असलेल्या देशात व देशासाठी असलेला केंद्र शासनाचा प्रतिनिधी असल्याचे मानले जाईल.

Leave a Reply