भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम ८६ :
इलेक्ट्रॉनिक अभिलेख आणि इलेक्ट्रॉनिक सह्या यांच्या संदर्भातले गृहीतक :
१) कोणत्याही इलेक्ट्रॉनिक संरक्षित अभिलेखाचे बाबतीत न्यायाधीश गृहीत धरील की, जो पर्यंत विरुद्ध शाबीत, झालेले नाही तोपावेतो संरक्षित इलेक्ट्रॉनिक अभिलेखामध्ये बदल झालेला नाही आणि त्याचा संदर्भ थेट विशिष्ट वेळेच्या संरक्षित दर्जापर्यंत पोचतो.
२) संरक्षित इलेक्ट्रॉनिक सह्यांच्या संदर्भात कोणत्याही कार्यवाहीत न्यायाधीश विरुद्ध शाबीत होईपावेतो गृहीत धरील की :
(a) क) वर्गणीदाराने संरक्षित इलेक्ट्रॉनिक सही केली होती आणि त्यामागे इलेक्ट्रॉनिक अभिलेखावर सही करणे आणि तो मान्य करणे हा इरादा होता.
(b) ख) संरक्षित इलेक्ट्रॉनिक अभिलेख अगर संरक्षित इलेक्ट्रॉनिक सही वगळता या कलमामधील तरतुदी इतर बाबतीत म्हणजे इलेक्ट्रॉनिक अभिलेखाच्या अगर इलेक्ट्रॉनिक सही स्वाक्षरी सत्यता आणि प्रामाणिकता यांचे संदर्भात कोणतेही गृहीत तत्व मान्य करणार नाही.