भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम ८० :
राजपत्रे, वृत्तपत्रे, इतर दस्तऐवज वगैरेबद्दल गृहीतक :
जो दस्तऐवज म्हणजे, शासकीय राजपत्र किंवा वृत्तपत्र किंवा रोजनामा असे दिसते अशा प्रत्येक दस्तऐवजाचा आणि जो दस्तऐवज एखाद्या व्यक्तीने ठेवावयाचा असे कायद्याद्वारे निदेशित केलेले असते, तशा प्रकारचा असल्याचे दिसते, तो दस्तऐवज कायद्याने आवश्यक केल्याप्रमाणे सारत: त्याच नमुन्यात ठेवलेला असून योग्य ताब्यातून हजर केलेला असेल तर, अशा प्रत्येक दस्तऐवजाचा खरेपणा न्यायालय गृहीत धरील.
स्पष्टीकरण :
या कलमाच्या आणि कलम ९२ च्या प्रयोजनांसाठी, दस्तऐवज ज्या ठिकाणी व ज्या व्यक्तिजवळ असणे स्वाभाविक आहे त्या ठिकाणी व त्या व्यक्तिच्या ताब्यात असतील तर ते योग्य ताब्यात असेल असे म्हटले जाते , मात्र ज्या ताब्याचा उगम वैध असल्याचे शाबीत झाले असेल किंवा त्या विशिष्ट प्रकरणातील परिस्थितीमुळे तसा उगम संभाव्य ठरत असेल तर, असा कोणताही ताबा अयोग्य नसतो.