Bsa कलम ७९ : पुराव्याची नोंद म्हणून हजर केलेल्या दस्तऐवजासंबंधी गृहीतक:

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम ७९ :
पुराव्याची नोंद म्हणून हजर केलेल्या दस्तऐवजासंबंधी गृहीतक:
जो दस्तऐवज म्हणजे एखाद्या साक्षदाराने न्यायिक कार्यवाहीत दिलेल्या साक्षीच्या किंवा अशी साक्ष घेण्यास कायद्याने प्राधिकृत अशा कोणत्याही अधिकाऱ्यापुढे दिलेल्या साक्षीचा किंवा त्या साक्षीच्या कोणत्याही भागाची नोंद किंवा टाचण असल्याचे दिसते अथवा कोणत्याही कैद्याचा किंवा आरोपी व्यक्तीचा कायद्यानुसार घेतलेला जबाब किंवा कबुलीजबाब असल्याचे दिसते आणि कोणत्याही न्यायाधीशाने किंवा दंडाधिकाऱ्याने किंवा पुर्वोक्त अशा कोणत्याही अधिकाऱ्याने स्वाक्षरित केला असल्याचे दिसते असा कोणताही दस्तऐवज न्यायालयापुढे हजर केला जाईल तेव्हा, न्यायालय असे गृहीत धरील की,-
एक) असा दस्तऐवज खरा आहे;
दोन) तो स्वाक्षरी करणाऱ्या व्यक्तीने ज्या परिस्थितीत तो घेण्यात आला त्याबाबत जी कथने केली असे दिसते ती खरी आहेत; आणि
तीन) असा पुरावा, जबाब व कबुलीजबाब रीतसर घेतला होता.

Leave a Reply