भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम ७७ :
अन्य अधिकृत दस्तऐवजांची शाबिती :
पुढील सार्वजनिक दस्तऐवज खालीलप्रमाणे शाबीत करता येतील:
(a) क) केंद्र शासनाचे कोणत्याही मंत्रालयाच्या आणि त्याच्या विभागांपैकी कोणत्याही विभागामार्फ त काढलेल्या किंवा राज्य शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या किंवा संघ राज्यक्षेत्राच्या प्रशासनाच्या कोणत्याही विभागाचे अधिनियम, आदेश किंवा अधिसुचना, –
एक) विभाग-प्रमुखाने प्रमाणित केलेल्या त्या त्या विभागांच्या दप्तरावरून;
दोन) जो दस्तऐवज अशा कोणत्याही शासनाच्या आदेशाने मुद्रित केला असल्याचे दिसले अशा कोणत्याही दस्तऐवजावरून;
(b) ख) संसदेचे किंवा राज्य विधान मंडळ कामकाज त्या त्या निकायाच्या रोजनाम्यांवरून अथवा प्रकाशित अधिनियम किंवा गोषवारे यांवरून अथवा संबंधित शासनाच्या आदेशाने ज्या प्रती मुद्रित केल्याचे दिसते त्या प्रतींवरून;
(c) ग) भारताचे राष्ट्रपति किंवा कोणत्याही राज्याचे राज्यपाल किंवा संघ राज्यक्षेत्राचे प्रशासक किंवा उपराज्यपाल द्वारा काढलेल्या उद्घोषणा, आदेश किंवा विनियम, राजपत्रातील अंतर्विष्ट प्रतींवरून किंवा गोषवाऱ्यांवरून;
(d) घ) परकीय देशाच्या शासनांगाच्या कृती किंवा तेथील विधानमंडाळेचे कामकाज त्यांच्या प्राधिकारान्वये प्रकाशित झालेल्या किंवा त्या देशात सर्वसामान्यपणे अधिकृत म्हणून मान्यता पावलेल्या रोजनाम्यावरून अथवा देशाच्या किंवा सत्ताधीशाच्या मोहोरेशी प्रमाणित केलेल्या प्रतीवरून, अथवा कोणत्याही केंद्रीय अधिनियमात त्यांची दखल घेण्यात आली असल्यास त्यावरून;
(e) ङ) एखाद्या राज्यातील नगरपालिकेचे स्थानिक संस्थेचे कामकाज, त्याच्या इतिवृत्ताच्या कायदोील रक्षकाने अशा इतिवृत्ताची जी प्रत प्रमाणित केली असेल तीवरून किंवा अशा निकायाच्या प्राधिकारान्वये जे प्रकाशित झाले असल्याचे दिसते त्या मुद्रित पुस्तकावरून;
(f) च) परकीय देशातील अन्य कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक दस्तऐवज, मूळ लेखावरून अथवा त्याच्या कायदेशीर रक्षकाने प्रमाणित केलेल्या ज्या प्रतीसोबत, मूळलेखाचा कायदेशीर ताबा ज्याच्याकडे असेल त्या अधिकाऱ्याने ती प्रत रीतसर प्रमाणित केलेली आहे असे लेखप्रमाणकाच्या किंवा भारतीय वाणिज्यदूताच्या किंवा राजदैतिक प्रतिनिधीच्या मोहोरेने अंकित असे प्रमाणपत्र असेल त्या प्रतीवरून आणि त्या दस्तऐवजाचे स्वरूप त्या परकीय देशाच्या कायद्याला अनुसरून आहे असे शाबीत करून.