Bsa कलम ७४ : सार्वजनिक – दस्तऐवज :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
सार्वजनिक दस्तऐवज :
कलम ७४ :
सार्वजनिक – दस्तऐवज :
१) पुढील दस्तऐवज सार्वजनिक दस्तऐवज आहेत:
(a) क) एक) सार्वभौम अधिसत्तेच्या (अधिकाराचे);
दोन) शासकीय निकायांच्या व अधिकरणांच्या; आणि
तीन) भारताच्या किंवा एखाद्या परकीय देशाचे विधानांग, न्यायांग किंवा शासनांग यांमधील लोक अधिकाऱ्यांच्या कृतींचे दृश्यस्वरूप असे किंवा त्या कृतींचे अभिलेख असलेले दस्तऐवज.
(b) ख) कोणत्याही राज्यात किंवा संघ राज्यक्षेत्रात ठेवलेले खाजगी दस्तऐवजांचे सार्वजनिक अभिलेख.
२) पोटकलम (१) मध्ये निर्दिष्ट केलेले दस्तावेज खेरीज करुन अन्य सर्व दस्तऐवज खाजगी आहेत.

Leave a Reply