Bsa कलम ७२ : सही, लिखाण किंवा मोहोर त्यांच्या कबुल केलेल्या किंवा शाबीत केलेल्या नमुन्याशी ताडून (पडताळून) पाहणे:

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम ७२ :
सही, लिखाण किंवा मोहोर त्यांच्या कबुल केलेल्या किंवा शाबीत केलेल्या नमुन्याशी ताडून (पडताळून) पाहणे:
१) एखादी स्वाक्षरी, लिखाण किंवा मोहोर ही अमुक एका व्यक्तीने लिहिली किंवा केली असल्याचे दिसते तेव्हा, ती त्या व्यक्तीची आहे किंवा कसे याची खात्री करण्यासाठी जी कोणतीही स्वाक्षरी, लिखाण किंवा मोहोर त्या व्यक्तीने लिहिली किंवा केली असल्याबाबत न्यायालयाचे समाधान होईल अशा रीतीने कबूल किंवा शाबीत करण्यात आले असेल ती स्वाक्षरी, लिखाण किंवा मोहोर अन्य कोणत्याही प्रयोजनासाठी हजर केली नसली किंवा शाबीत केली नसली तरीही, ती शाबीत कराव्याच्या स्वाक्षरीशी, लिखाणाशी किंवा मोहोरेशी ताडून पाहता येईल.
२) जे कोणतेही शब्द किंवा आकडे एखाद्या व्यक्तीने लिहिले असल्याचे अभिकथन करण्यात आले आहे ते ताडून पाहणे शक्य व्हावे यासाठी न्यायालय, अशी व्यक्ती न्यायालयात उपस्थित असताना तिला काही शब्द किंवा आकडे लिहून दाखवण्याबाबत निदेश देऊ शकेल.
३) हे कलम , कोणत्याही आवश्यक बदलांसह, बोटांच्या ठशांच्या बाबतीत सुद्धा लागू आहे.

Leave a Reply