Bsa कलम ६७ : कायद्याने साक्षांकित करणे आवश्यक असलेल्या दस्तऐवजाचे निष्पादन शाबीत करतो:

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम ६७ :
कायद्याने साक्षांकित करणे आवश्यक असलेल्या दस्तऐवजाचे निष्पादन शाबीत करतो:
एखादा दस्तऐवज साक्षांकित करणे कायद्यानुसार आवश्यक असल्यास, साक्ष करणारा एखादा तरी साक्षीदार जिवंत असून न्यायालयाच्या आदेशिकेला अधीन असेल आणि साक्ष देण्यास समर्थ असेल तर, त्या दस्तऐवजाचे निष्पादन झाल्याचे शाबीत करण्यासाठी, त्यावर साक्षांकन करणारा किमान एकतरी साक्षीदार बोलावला गेल्याशिवाय तो दस्तऐवज पुरावा म्हणून वापरता येणार नाही:
परंतु, मृत्युपत्रेत्तर असा जो कोणताही दस्तऐवज भारतीय नोंदणी अधिनियम, १९०८ (१९०८ चा १६) याच्या उपबंधानुसार नोंदलेला असेल त्याचे निष्पादन ज्या व्यक्तीने केल्याचे दिसते. तिने तो निष्पादित केला हे स्पष्टपणे नाकबूल करण्यात आले असल्याशिवाय, त्याच्या निष्पादनाच्या शाबितीसाठी, त्यावर साक्षांकन करणारा साक्षीदाराला बोलावण्याची आवश्यकता असणार नाही.

Leave a Reply