भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम ६१ :
इलैक्ट्रॉनिक किंवा डिजिटल अभिलेख :
या अधिनियमातील कोणतीही गोष्ट इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल पुराव्याच्या ग्राह्यतेला नाकारणार नाही कारण ते इलैक्ट्रॉनिक किंवा डिजिटल अभिलेख आहेत आणि असे अभिलेख कलम ६३ च्या अधीन याचा कायदेशीर प्रभाव, विधिमान्यता आणि अंमलबजावणीक्षमता असेल.