भारतीय पुरावा अधिनियम २०२३
कलम ५ :
वादतथ्याचा किंवा संबद्ध (सुसंगत) तथ्याचा प्रसंग, कारण किंवा परिणाम असणारी तथ्ये :
जी तथ्ये संबद्ध तथ्यांशी किंवा वादतथ्यांशी ती घडून येण्याचा प्रसंग, कारण किंवा परिणाम म्हणून निकटपणे किंवा अन्यथा अन्वित असतील अथवा ज्या स्थितीत ती घडून आली किंवा जिच्यामुळे घडून येण्यास किंवा ती घडवून आणण्यास संधी मिळाली त्या स्थितीची घटक असतील ती तथ्ये संबद्ध असतात.
उदाहरणे :
(a) क) (ऐ) ने (बी) ची जबरी चोरी केली किंवा काय हा प्रश्न आहे. जबरी चोरी होण्याच्या थोडे पूर्वी (बी) स्वत:जवळ पैसे बाळगून जत्रेला गेला होता व ते त्याने त्रयस्थ व्यक्तिंना दाखवले होते किंवा आपणांजवळ ते आहेत या तथ्याचा त्याने उल्लेख केला होता ही तथ्ये संबद्ध (सुसंगत) आहेत.
(b) ख) (ऐ) ने (बी) चा खून केला किंवा काय हा प्रश्न आहे. जेथे खून झाला होता त्या ठिकाणी किंवा त्याच्या जवळपास झटापटीमुळे जमिनीवर झालेल्या खुणा ही संबद्ध (सुसंगत) तथ्ये आहेत.
(c) ग) (ऐ) ने (बी) वर विषप्रयोग केला किंवा काय हा प्रश्न आहे. विषप्रयोगाशी ज्यांचा संबंध जोडण्यात आला ती लक्षणे दिसून येण्यापूर्वीचे (बी) चे प्रकृतिमान व (ऐ) ला माहीत असलेल्या (बी) च्या ज्या सवयींमुळे विषप्रयोग करण्यास संधी मिळाली त्या सवयी, ही संबद्ध तथ्ये आहेत.