भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम ४४ :
नात्याबाबतचे मत केव्हा संबद्ध :
एखाद्या व्यक्तीचे दुसऱ्या व्यक्तीशी जे नाते आहे त्याबाबत जेव्हा न्यायालयाला मत बनवावयोच असेल तेव्हा, त्या कुटुंबाची घटक व्यक्ती म्हणून किंवा अन्यथा ज्या कोणत्याही व्यक्तीला अशा नात्याचे अस्तित्व जाणून घेण्याची विशेष साधने उपलब्ध होती तिच्या वर्तनाद्वारे व्यक्त झालेले तिचे त्या विषयावरील मत हे संबद्ध तथ्य असते:
परंतु, भारतीय घटस्फोट अधिनियम, १८६९ (१८६९ चा ४) याखालील कार्यवाहींमध्ये किंवा भारतीय न्याय संहिता २०२३ कलमांखालील खटल्यांमध्ये विवाह शाबीत करण्याच्या प्रयोजनार्थ असे मत पुरेसे होणार नाही.
उदाहरणे :
(a) क) (ऐ) व (बी) हे विवाहबद्ध झाले होते किंवा काय हा प्रश्न आहे. त्यांची मित्रमंडळी त्यांना दांपत्य समजून त्याप्रमाणे त्यांच्याशी वागत होती हे तथ्य संबद्ध आहे.
(b) ख) (ऐ) हा (बी) चा औरस मुलगा होता किंवा काय असा प्रश्न आहे. त्या कुटुंबातील घटकव्यक्ती (ऐ) ला त्याच नात्याने वागवीत होत्या हे तथ्य संबद्ध आहे.