Bsa कलम ४३ : परिपाठ तत्त्वप्रणाली वगैरेबाबत मते केव्हा संबद्ध :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम ४३ :
परिपाठ तत्त्वप्रणाली वगैरेबाबत मते केव्हा संबद्ध :
एक) कोणत्याही लोकसमूहाचे किंवा घराण्याचे परिपाठ व तत्त्वप्रणाली,
दोन) कोणत्याही धार्मिक किंवा धर्मादायी प्रतिष्ठानाची घटना व प्रशासन, किंवा
तीन) विशिष्ट जिल्ह्यांमध्ये किंवा विशिष्ट लोकवर्गांमध्य वापरल्या जाणाऱ्या शब्दांचा किंवा संज्ञांचा अर्थ, याबाबत जेव्हा न्यायालयाला मत बनवावयाचे असेल तेव्हा,
ते जाणून घेण्याची विशेष साधने उपलब्ध असलेल्या व्यक्तींची मते ही, संबद्ध तथ्ये असतात.

Leave a Reply