Bsa कलम ४१ : हस्ताक्षर व डिजिटल हस्ताक्षर बद्दलचे मत केव्हा संबद्ध (सुसंगत):

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम ४१ :
हस्ताक्षर व डिजिटल हस्ताक्षर बद्दलचे मत केव्हा संबद्ध (सुसंगत):
एखादा दस्तऐवज कोणत्या व्यक्तीने लिहिला असावा किंवा स्वाक्षरित केला असावा याबाबत जेव्हा न्यायालयाला मत बनवावयाचे असेल तेव्हा, ज्या व्यक्तीने तो लिहिला किंवा स्वाक्षरित केला असा समज आहे तिच्या हस्ताक्षराशी परिचित असलेल्या कोणत्याही व्यक्तीचे, तो दस्तऐवज त्या व्यक्तीने लिहिला किंवा स्वाक्षारित केला होता किंवा नव्हाता याविषयीचे मत हे संबद्ध (सुसंगत) तथ्य असते.
स्पष्टीकरण :
जेव्हा एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला लिहिताना पाहिलेले असेल, अथवा स्वत: किंवा स्वत:च्या प्राधिकारान्वये त्या दुसऱ्या व्यक्तीला उद्देशुन लिहिलेल्या दस्तऐवजांच्या उत्तरादखल तिच्याकडे त्या दुसऱ्या व्यक्तीने लिहिलेले असल्याचे दिसणारे दस्तऐवज आलेले असतील, अथवा सामन्य व्यवहाराक्रमानुसार तिच्याकडे त्या दुसऱ्या व्यक्तीने लिहिले असल्याचे दिसणारे दस्तऐवज नेहमी सादर करण्याचा शिरस्त असेल तेव्हा, ती त्या दुसऱ्या व्यक्तीच्या हस्ताक्षराशी परिचित आहे असे म्हणतात.
उदाहरण :
अमुक एक पत्र (ऐ) या ईटानगरमधील व्यापाऱ्याच्या हस्ताक्षरातील आहे किंवा काय हा प्रश्न आहे. (बी) हा बँगलोरातील व्यापारी असून, त्याने (ऐ) ला उद्देशून पत्रे लिहिलेली आहेत आणि (ऐ) ने लिहिली असल्याचे दिसणारी पत्रे त्याला आलेली आहेत. (सी) हा (बी) चा कारकून असून, (बी) ची पत्रे तपासून ती दप्तरदाखल करणे हे त्याचे काम होते. (डी) हा (बी) चा दलाल आहे व (ऐ) ने (बी) ला त्याबाबत सल्लामसलत करण्यासाठी जी पत्रे लिहिली असल्याचे दिसते ती पत्रे नहमी (डी) ला सादर करण्याचा (बी) चा शिरस्ता होता. (बी), (सी) आणि (डी) यांनी (ऐ) ला लिहिताना पाहिले नसले तरी, ते पत्र (ऐ) च्या हस्ताक्षरात आहे किंवा कसे या प्रश्नावरील (बी), (सी) आणि (डी) यांची मते संबद्ध आहेत.
२) ज्या वेळी न्यायालयास इलेक्ट्रॉनिक सही कोणाची आहे याबाबत मत बनवायचे असेल त्या वेळी इलेक्ट्रॉनिक सहीचा दाखला देणाऱ्या अधिकाऱ्याचे मत हे संबद्ध तथ्य असते.

Leave a Reply