भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम ३८ :
न्यायनिर्णय वगैरे देताना कपट किंवा संगनमत झाल्याचे अगर न्यायालय अक्षम असल्याचे शाबीत करता येते:
दाव्यातील किंवा अन्या कायवाहीतील कोणताही पक्षकार, कलम ३४, ३५ किंवा ३६ खाली जो कोणताही न्यायनिर्णय, आदेश किंवा हुकूमनामा संबद्ध आहे, व जो विरूद्ध पक्षाने शाबीत केलेला आहे, तो देण्यास सक्षम नसलेल्या न्यायालयाने तो दिला होता अथवा कपटाने किंवा संगनमताने तो मिळवण्यात आला होता हे दाखवू शकेल.