Bsa कलम ३३ : ज्या वेळी कथन मोठ्या कथनाचा – संभाषणाचा भाग असेल अगर इलेक्ट्रॉनिक अभिलेखाचा भाग असेल अथवा पुस्तकाचा अगर सलग पत्रांच्या किंवा कागदपत्रांच्या मालिकेचा भाग असेल तेव्हा कोणता पुरावा द्यावयाचा :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कथनापैकी कोणता भाग शाबीत करावयाचा :
कलम ३३ :
ज्या वेळी कथन मोठ्या कथनाचा – संभाषणाचा भाग असेल अगर इलेक्ट्रॉनिक अभिलेखाचा भाग असेल अथवा पुस्तकाचा अगर सलग पत्रांच्या किंवा कागदपत्रांच्या मालिकेचा भाग असेल तेव्हा कोणता पुरावा द्यावयाचा :
जेव्हा ज्याचा पुरावा दिलेला आहे असे कोणतेही कथन हे जेव्हा अधिक मोठ्या कथनाचा किंवा संभाषाणाचा भाग असेल अथवा एका सुट्या दस्तऐवजाचा भाग असेल अथवा एखाद्या पुस्तकाचा किंवा इलेक्ट्रॉनिक अभिलेखाचा भाग किंवा सलग पत्रांच्या किंवा कागदपत्रांच्या मालिकेचा भाग असेल तेव्हा, ते मोठे कथन, संभाषण, दस्तऐवज, इलेक्ट्रॉनिक अभिलेख पुस्तक किंवा पत्रांची अगर कागदपत्रांची मालिका यांचा जितका भाग, त्या विशिष्ट कामात त्या कथनाचे स्वरूप व परिणाम आणि कोणत्या परिस्थितीत ते कथन केलेले होते, याचे संपूर्ण आकलन होण्यासाठी न्यायालयाला जरूरीचा वाटेल तितक्याच भागाचा पुरावा द्यावा लागेल, अधिक नाही.

Leave a Reply