Bsa कलम ३२ : विधीग्रंथामध्ये समाविष्ट असलेल्या कायद्यांची संबद्धता ज्यामध्ये इलैक्ट्रॉनिक किंवा डिजिटल प्ररुपाचाही समावेश आहे :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम ३२ :
विधीग्रंथामध्ये समाविष्ट असलेल्या कायद्यांची संबद्धता ज्यामध्ये इलैक्ट्रॉनिक किंवा डिजिटल प्ररुपाचाही समावेश आहे :
जेव्हा न्यायालयाला कोणत्याही देशाच्या कायद्यासंबंधी मत बनवावयाचे असेल तेव्हा, जे पुस्तक ज्यामध्ये इलैक्ट्रॉनिक किंवा डिजिटल प्ररुपाचा समावेश आहे, अशा देशाच्या शासनाच्या प्राधिकारन्वये मुद्रित किंवा प्रकाशित झाले असून असा कोणताही कायदा त्यात अंतभूत आहे असे दिसते त्या पुस्तकात इलैक्ट्रॉनिक किंवा डिजिटल प्ररुपासह असलेले अशा कायद्याचे कोणतेही कथन व जे पुस्तक इलैक्ट्रॉनिक किंवा डिजिटल प्ररुपासह अशा देशाच्या न्यायालयाच्या कोणत्याही अधिनिर्णयांचे प्रतिवृत्त असल्याचे दिसते त्या पुस्तकातील इलैक्ट्रॉनिक किंवा डिजिटल प्ररुपासह अशा अधिनिर्णयाचे कोणतेही प्रतिवृत्त हे संबद्ध असते.

Leave a Reply