भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम २९ :
कर्तव्य पार पाडताना सार्वजनिक दप्तरात किंवा इलेक्ट्रॉनिक अभिलेखात केलीली नोंद :
वादतथ्य किंवा संबद्ध तथ्य नमूद करणारी कोणत्याही सार्वजनिक पुस्तकातील किंवा अन्य कार्यालयीन पुस्तकातील, नोंदपुस्तकातील किंवा दप्तरातील इलेक्ट्रॉनिक अभिलेखातील व लोकसेवकाने आपले पदीय काम पार पाडताना किंवा ज्या देशात असे पुस्तक, नोंदपुस्तक किंवा अभिलेख अगर इलेक्ट्रॉनिक अभिलेख ठेवला असेल त्या देशाच्या कायद्याद्वारे खास विहित केलेले काम करताना अन्य कोणत्याही व्यक्तीने केलेली नोंद ही स्वयमेव एक संबद्ध तथ्य असते.