भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
विशेष परिस्थितीत केलेली कथने : / कथनापैकी कोणता भाग शाबीत करावयाचा :
कलम २८ :
हिशोबाच्या पुस्तकातील नोंदी केव्हा संबद्ध (सुसंगत) :
व्यवहाराक्रमानुसार नियमितपणे ठेवल्या जाणाऱ्या नोंदवहीमधील नोंदी, तसेच ज्या नोंदी इलेक्ट्रॉनिक नमुन्यामध्ये केलेल्या आहेत. त्या देखील नोंदी न्यायालयाला ज्या बाबीची चौकशी करावयाची असेल तिचा त्या नोंदीमध्ये जेव्हा जेव्हा निर्देश केलेला असेल तेव्हा संबद्ध असतात, पण केवळ अशी कथने कोणत्याही व्यक्तीला दायित्वाधीन करण्यास पुरेशी नसतात.
उदाहरण :
(ऐ) हा (बी) विरुद्ध १००० रुपयांकरता दावा लावतो व (बी) उक्त रकमेबद्दल आपला ऋृणाईत आहे असे दर्शविणाऱ्या आपल्या हिशेब-पुस्तकांमधील नोंदी क दाखवितो. या नोंदी ऋृण शाबीत करणाच्या दृष्टीने संबद्ध आहेत, पण अन्य पुरावा नसताना, ते शाबीत करण्यास त्या पुरेशा नाहीत.