Bsa कलम २३ : पोलीस अधिकाऱ्यापुढे दिलेला कबुली जबाब :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम २३ :
पोलीस अधिकाऱ्यापुढे दिलेला कबुली जबाब :
१) पोलीस अधिकाऱ्याकडे दिलेला कोणताही कबुलीजबाब कोणत्याही अपराधाचा आरोप असलेल्या व्यक्तीविरूद्ध शाबीत करता येणार नाही.
२) कोणतीही व्यक्ती पोलीस अधिकाऱ्याच्या हवालतीत असताना तिने दिलेला कबुलीजबाब हा दंडाधिकाऱ्याचे प्रत्यक्ष उपस्थितीत दिलेला नसेल तर, तो अशा व्यक्तीविरूद्ध शाबीत करता येणारा नाही :
परंतु, कोणत्याही अपराधाचा आरोप असलेली एखादी व्यक्ती पोलीस अधिकाऱ्याच्या हवालतीत असताना तिच्याकडून मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने एखादे तथ्य उघडकीस आले आहे अशी जबानी देण्यात आली असेल तेव्हा, अशा माहितीपैकी जेवढा भाग उघडकीस आलेल्या तथ्याशी नि:संदिग्धपणे संबंधित असेल तेवढा शाबीत करता येईल – मग कबुलीजबाब या सदरात तो येवो वा न येवो.

Leave a Reply