भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम २२ :
फौजदारी कारवाईत कबुली जर प्रलोभन, धमकी, जबरदस्ती (दबाव) किंवा वचन यामुळे दिलेली असेल तर असंबद्ध (विसंगत) :
आरोपी व्यक्तीविरूद्ध केल्या गेलेल्या दोषारोपाच्या संबंधात अधिकारस्थानावरील व्यक्तीने कोणतेही प्रलोभन दाखवल्यामुळे, धमकी दिल्यामुळे, जबरदस्ती केल्यामुळे किंवा वचन दिल्यामुळे आरोपीने कबुलीजबाब दिलेला आहे असे न्यायालयाला दिसून आले व तसा कबुलीजबाब दिल्याने आपल्याविरूद्ध होणाऱ्या कार्यवाहीत आपल्याला ऐहिक स्वरूपाचा काही फायदा होईल किंवा तशा स्वरूपाचा काही दुष्परिणाम टाळता येईल असे मानण्याच्या दृष्टीने आरोपीला वाजवी वाटतील अशी कारणे त्याला मिळण्यास न्यायालयाच्या मते ते प्रलोभन, धमकी, जबरदस्ती किंवा वचन पुरेसे असेल तर, तो कबुलीजबाब फौजदारी कार्यवाहीत असंबद्ध (विसंगत) असतो :
परंतु न्यायालयाच्या मते, अशा प्रलोभन, धमकी, जबरदस्ती किंवा वचनाद्वारे कबुलीजबाब देण्याचे परिणाम (प्रभाव) काढून टाकले असल्यास तो संबद्ध (सुसंगत) असतो :
परंतु आणखी असे की, जर अशी कबुली अन्यथा संबद्ध (सुसंगत) असेल, तर ती केवळ गोपनीयतेच्या अभिवचनाखाली किंवा ती मिळविण्याच्या उद्देशाने आरोपी व्यक्तीवर केलेल्या फसवणुकीच्या परिणामी, किंवा तो मद्यधुंद अवस्थेत असताना असंबद्ध (विसंगत) ठरत नाही किंवा ज्या प्रश्नांची त्याला उत्तरे देण्याची गरज नाही अशा प्रश्नांची उत्तरे म्हणून ती तयार केली गेली होती, त्या प्रश्नांचे स्वरूप जे काही असू शकते, किंवा त्याला अशी कबुली देण्यास बांधील नसल्याची चेतावणी दिली गेली नव्हती आणि त्याचा पुरावा म्हणून त्याच्या विरोधात वापरला जाऊ शकतो.