Bsa कलम २१ : दिवाणी दाव्यांमध्ये कबुली केव्हा संबद्ध असतात :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम २१ :
दिवाणी दाव्यांमध्ये कबुली केव्हा संबद्ध असतात :
दिवाणी कामांमध्ये कोणतीही कबुली एकतर तिचा पुरावा द्यावयाचा नाही अशा स्पष्ट शर्तीवर दिलेली असेल तर किंवा तिचा पुरावा देऊ नये पक्षांमध्ये आपापसात करार झालेला असावा असे जीवरून न्यायालय अनुमान काढू शकते अशा परिस्थितीत दिलेली असेल तर, ती संबद्ध नसते.
स्पष्टीकरण :
कोणत्याही वकिलाला १३२ व्या कलमाच्या पोटकलम (१) व (२) खाली ज्याबाबत साक्ष देण्यास भाग पाडले जाईल अशा कोणत्याही बाबींसंबंधी साक्ष देण्यापासून त्याला या कलमातील कोणत्याही गोष्टीमुळे सुट मिळते असे मानले जाणार नाही.

Leave a Reply