भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम २० :
दस्तऐवजांच्या मजकुराबाबत तोंडी कबुल्या केव्हा संबद्ध असतात :
दस्तऐवजाचा मजकूर शाबीत करू पाहणाऱ्या पक्षकाराने अशा दस्तऐवजाच्या मजकुराचा दुय्यम पुरावा देण्यास यात यापुढे अंतर्भूत असलेल्या नियमांखाली आपण हक्कदार असल्याचे दाखवून दिले नाही, तर व तोपर्यंत किंवा हजर केलेल्या दस्तऐवजाच्या खरेपणाबाबत शंका असल्याशिवाय दस्तऐवजांच्या मजकुराबाबतच्या तोंडी कबुल्या संबद्ध करणार नाहीत.