भारतीय पुरावा अधिनियम २०२३
(२०२३ चा अधिनियम क्रमांक ४७)
निष्पक्ष संपरिक्षा करण्यासाठी पुराव्याचे सामान्य नियम एकत्रित करण्यासाठी आणि सिद्धांताचे उपबंध करण्यासाठी अधिनियम
भारतीय गणराज्याच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी संसदेकडून पुढीलप्रमाणे अधिनियमित होवो :-
भाग १ :
प्रकरण १ :
प्रारंभिक :
कलम १ :
संक्षिप्त नाव, लागू होणे व प्रारंभ :
१) या अधिनियमाचे संक्षिप्त नाव भारतीय पुरावा अधिनियम २०२३ आहे.
२) हा लष्करी न्यायालयांसहित कोणत्याही न्यायालयातील किंवा न्यायालयापुढील सर्व न्यायिक कार्यवाहींना तो लागू आहे, पण कोणत्याही न्यायालयाल, अधिकारी किंवा मध्यस्था समोर केलेल्या कार्यवाहींना तो लागू नाही;
३) केन्द्र शासन अधिकृत राजपत्रात अधिसूचनेद्वारे नियुक्त करेल अशा १.(तारखेला) तो लागू होईल.
——–
१. १ जुलै २०२४, अधिसूचना क्रमांक एस. ओ. ८४९ (ई), दिनांक २३ फेब्रुवारी २०२४, भारताचे राजपत्र, असाधारण, भाग २, कलम ३ (दोन) पहा.