भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम १८ :
दाव्यातील पक्षकाराने स्पष्टपणे सूचित केलेल्या व्यक्तींची कबुली :
दाव्यातील पक्षकाराने तंटा-विषयाच्या संदर्भात माहितीसाठी स्पष्टपणे ज्यांचा निर्देश केला असेल त्या व्यक्तींनी केलेली कथने म्हणजे कबुल्या होत.
उदाहरण :
(ऐ) ने (बी) ला विकलेला घोडा निकोप आहे किंवा काय हा प्रश्न आहे. (ऐ) हा (बी) ला म्हणतो – (सी) ला जाऊन विचार – (सी) ला त्याची सर्व माहिती आहे. (सी) चे कथन ही कबुली आहे.