भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
प्रकरण ११ :
पुरावा अयोग्यपणे स्वीकृत करणे आणि नाकारणे याविषयी :
कलम १६९ :
पुरावा अयोग्यपणे स्वीकृत केल्याबद्दल किंवा नाकारल्याबद्दल नवीन संपरीक्षा नाही:
पुरावा अयोग्यपणे स्वीकृत केला किंवा नाकारण्यात आला असा आक्षेप ज्या न्यायायालयापुढे घेण्यात आला असेल त्या न्यायालयाला जर असे वाटले की, आक्षेप घेण्यात आला असून जो पुरावा स्वीकारण्यात आला तो वगळता, त्या निर्णयाचे समर्थन करण्याइतपत पुरेसा स्वतंत्र पुरावा होता अथवा नाकरलेला पुरावा स्वीकृत करण्यात आला असता तरी त्यामुळे निर्णयात फरक करणे इष्ट नव्हते. तर, तशा कोणत्याही प्रकरणी तो अयोग्यपणे स्वीकृत केला गेला किंवा नाकारण्यात आला एवढेच कारण नवीन संपरीक्षा करण्यास किंवा कोणताही निर्णय फिरवण्यास पुरणार नाही.