भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम १६४ :
आठवण ताजी करणाऱ्या दस्तऐवजाबाबत विरूद्ध पक्षाचा हक्क :
लगतपूर्वीच्या दोन कलमांच्या उपबंधांन्वये पाहिलेले कोणतेही लिखाण हजर केले गेले पाहिजे आणि विरूद्ध पक्षकाराने ते मागितल्यास त्याला ते दाखवण्यात आले पाहिजे; अशा पक्षकाराला वाटल्यास त्यावरून साक्षीदाराची उलटतपासणी घेता येईल.