Bsa कलम १६३ : कलम १६२ मधील दस्तऐवजामधील तथ्ये आणि त्यासंबंधी साक्ष :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम १६३ :
कलम १६२ मधील दस्तऐवजामधील तथ्ये आणि त्यासंबंधी साक्ष :
कलम १६२ मध्ये उल्लेखिलेल्या अशा कोणत्याही दस्तऐवजात उल्लेखिलेली प्रत्यक्ष तथ्ये साक्षीदाराला निश्चित आठवत नसली तरी, जर ती तथ्ये दस्तऐवजात अचूकपणे नमूद केलेली आहेत याबद्दल खात्री नसेल तर, त्या तथ्यांविषयी त्याला साक्ष देता येईल.
उदाहरण :
एखाद्या हिशेबनीसाने व्यवहारक्रमानुसार नियमितपणे ठेवलेल्या चोपड्यामध्ये नोंदी बरोबर लिहिल्या जात होत्या हे त्याला स्वत:ला माहीत असेल तर, नोंद केलेले विशिष्ट संव्यवहार तो विसरला असला तरीही, त्याने त्या चोपड्यांमध्ये नमूद केलेल्या तथ्यांबद्दल त्याला साक्ष देता येईल.

Leave a Reply