Bsa कलम १६२ : स्मृतीला उजाळा देणे :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम १६२ :
स्मृतीला उजाळा देणे :
१) साक्षीदाराची तपासणी चालू असताना, त्याला ज्या घडामोडीबाबत प्रश्न विचारले जातील ती घडण्याच्या वेळी किंवा त्यानंतर, जोवर ती त्याच्या स्मरणात ताजी राहिली असण्याचा संभव आहे असे न्यायालयाला वाटते इतक्या अल्पावधीतच त्याने स्वत: लिहून ठेवलेले लिखाण पाहून तो आपल्या स्मृतीस उजाळा देऊ शकेल :
परंतु इतर कोणत्याही व्यक्तीने लिहिलेले व साक्षीदाराने पूर्वोक्त कालावधीत वाचलेले असे कोणतेही लिखाण, त्याने ते ज्यावेळी वाचले त्या वेळी ते बरोबर असल्याचे त्याला माहीत असल्यास त्याला पाहता येईल.
२) स्वत:च्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी साक्षीदाराला दस्तऐवजाची प्रत केव्हा वापरता येईल. ज्या ज्या बाबतीत साक्षीदाराला कोणताही दस्तऐवज पाहून आपल्या स्मृतीला उजाळा देता येईल त्या त्या बाबतीत, त्याला न्यायालयाच्या परवानगीने अशा दस्तऐवजाची प्रत पाहता येईल :
परंतु असे की मूळ लेख हजर न करण्यास पुरेसे कारण आहे याबाबत न्यायालयाचे समाधान झाले पाहिजे :
परंतु आणखी असे की व्यावसायिक विवेचकग्रंथ पाहून तज्ज्ञाला स्वत:च्या स्मृतीला उजाळा देता येईल.

Leave a Reply