भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम १६१ :
कलम २६ किंवा कलम २७ खाली संबद्ध कथनातील कोणत्या बाबी शाबीत करता येतील :
जेव्हा जेव्हा कलम २६ किंवा २७ खाली संबद्ध असे कोणतेही कथन शाबीत केले जाईल तेव्हा, ज्या व्यक्तीने ते कथन केले तिला साक्षीदार म्हणून बोलावले असते व सूचित तथ्यातील सत्य त्याने उलटतपासणीच्या वेळी नाकबूल केले असते तर ज्या बाबी शाबीत करता आल्या असतया अशा सर्व बाबी त्या कथनास विरोध करण्यासाठी किंवा त्याला परिपुष्टी देण्यासाठी किंवा त्या व्यक्तीच्या विश्वासपात्रतेबाबत संशय व्यक्त करण्यासाठी किंवा त्याच्या विश्वासपात्रतेबद्दल खात्री करून घेण्यासाठी शाबती करता येतील.