Bsa कलम १५७ : पक्षकाराने स्वत:च्या साक्षीदारास प्रश्न करणे :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम १५७ :
पक्षकाराने स्वत:च्या साक्षीदारास प्रश्न करणे :
१) विरूद्ध पक्षकार, उलटतपासणीमध्ये जे कोणतेही प्रश्न विचारू शकेल ते प्रश्न आपल्या साक्षीदाराला विचारण्यासाठी, साक्षीदाराला बोलाविणाऱ्या व्यक्तीला न्यायालय परवानगी देऊ शकेल.
२) या कलमातील कोणत्याही गोष्टीमुळे पोटकलम (१) अन्वये अशा प्रकारची परवानगी दिलेल्या व्यक्तीचा, अशा साक्षीदाराच्या पुराव्याच्या कोणत्याही भागावर विसंबून राहण्याचा हक्क काढून घेण्यास येणार नाही.

Leave a Reply