भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम १५५ :
अपमान करण्यासाठी किंवा ताप देण्यासाठी योजलेले प्रश्न :
एखादा प्रश्न अपमान करण्याच्या किंवा ताप देण्याच्या इराद्याने योजलेला आहे असे न्यायालयाला वाटले किंवा एखादा प्रश्न केवळ प्रश्न म्हणून योग्य असला तरी त्याचे स्वरूप अकारण क्षोभक आहे असे न्यायालयाला वाटले तर, न्यायालय त्याला मनाई करील.