Bsa कलम १५२ : वाजवी आधारकारणांशिवाय प्रश्न विचारावयाचे नाहीत :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम १५२ :
वाजवी आधारकारणांशिवाय प्रश्न विचारावयाचे नाहीत :
कलम १५१ मध्ये निर्दिष्ट केलेला असा कोणताही प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीला त्या प्रश्नातून सूचित होणाऱ्या अभ्यारोपाला पुरेसा आधार आहे असे मानण्यास वाजवी कारणे असल्याशिवाय तसा प्रश्न विचारला जाऊ नये.
उदाहरणे :
(a) क) एक महत्वाचा साक्षीदार हा एक डाकू आहे अशी माहिती एका वकीलाने दुसèया वकीलाला दिलेली आहे. साक्षीदार स्वत: डाकू आहे किंवा काय हे त्याला विचारण्यास वाजवी आधारकारण आहे.
(b) ख) एक महत्वाचा साक्षीदार डाकू आहे असे न्यायालयातील एका व्यक्तीकडून वकीलाला सांगण्यात आले आहे. माहिती देणाऱ्याला वकीलाने प्रश्न विचारले असता तो आपल्या कथनामागील आधारकारण समाधानकारकपणे देतो. साक्षीदार स्वत: डाकू आहे किंवा काय हे त्याला विचारण्यास वाजवी आधारकारण आहे.
(c) ग) ज्या साक्षीदारासंबंधी कसलीच माहिती नाही त्याला तो स्वत: डाकू आहे किंवा काय असे कसलाच आगापीछा नसताना विचारण्यात आले. या प्रश्नामागे कोणतीही वाजवी आधारकारणे नाहीत.
(d) घ) ज्या साक्षीदारासंबंधी कसलीच माहिती नाही त्याला त्याच्या जीवनपद्धतीविषयी व उपजीविकेच्या साधनाविषयी प्रश्न विचारण्यात आल्यावर तो असमाधानकारक उत्तरे देतो. तो स्वत: डाकू आहे किंवा काय असे त्याला विचारण्यास हे वाजवी आधारकारण होऊ शकेल.

Leave a Reply