Bsa कलम १४७ : लेखी बाबीसंबंधी पुरावा :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम १४७ :
लेखी बाबीसंबंधी पुरावा :
कोणत्याही साक्षीदाराची साक्षतपासणी चालू असताना, ज्याविषयी तो पुरावा देत आहे अशी कोणतीही संविदा, देणगी किंवा अन्य संपत्तिव्यवस्था एखाद्या दस्तऐवजात निविष्ट नव्हती किंवा काय असे त्याला विचारता येईल व ती त्यात निविष्ट होतो असे जर तो म्हणाला किंवा जो कोणताही दस्तऐवज न्यायालयाच्या मते हजर करावायास हवा त्यातील मजकुरासंबंधी कोणतेही कथन करण्याच्या तो बेतात असेल तर, असा दस्तऐवज हजर केला जाईपर्यंत अथवा त्या साक्षदाराला बोलावणारा पक्षकार त्या दस्तऐवजाचा दुय्यम पुरावा देण्यास ज्यांमुळे हक्कदार होतो ती तथ्ये शाबीत केली जाईपर्यंत विरूद्ध पक्षकार अशी साक्ष दिली जाण्यास आक्षेप घेऊ शकेल.
स्पष्टीकरण :
दस्तऐवजांच्या मजकुरासंबंधी अन्य व्यक्तींनी केलेली कथने हीच नेमकी संबद्ध तथ्ये असतील तर, साक्षीदाराला अशा कथनांचा तोंडी पुरावा देता येईल.
उदाहरण :
(ऐ) ने (बी) वर हमला केला होता काय हा प्रश्न आहे. (बी) ने माझ्यावर चोरीचा आरोप करणारे पत्र लिहिले आणि मी त्याबद्दल त्याच्यावर सूड उगवणार आहे असे (ऐ) हा (डी) ला म्हणत असताना आपण ते ऐकले अशी (सी) जबानी देतो. (ऐ) चा हमल्यामागील हेतू दाखवणारे म्हणून हे कथन संबद्ध आहे, आणि पत्राविषयी अन्य कोणताही पुरावा दिलेला नसला तरी याचा पुरावा देता येईल.

Leave a Reply