भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम १४२ :
साक्षीदारांची तपासणी :
१) एखाद्या साक्षीदाराला ज्या पक्षकाराने बोलावले असेल त्याने केलेल्या त्याच्या साक्षतपासणीला त्याची सरतपासणी असे म्हटले जाईल.
२) विरूद्ध पक्षकाराने साक्षीदाराची साक्षतपासणी केल्यास तिला त्याची उलटतपासणी असे म्हटले जाईल.
३) एखाद्या साक्षीदाराला ज्या पक्षकाराने बोलावले असेल त्याने साक्षीदाराच्या उलटतपासणीनंतर केलेल्या त्याच्या साक्षतपासणीला त्याची फेरतपासणी असे म्हटले जाईल.