Bsa कलम १४१ : पुराव्याचे स्वीकार्यतेविषयी न्यायाधीशाने निर्णय घेणे :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम १४१ :
पुराव्याचे स्वीकार्यतेविषयी न्यायाधीशाने निर्णय घेणे :
१) जेव्हा एखादा पक्षकार कोणत्याही तथ्याबद्दल पुरावा देऊ पाहत असेल तेव्हा, अभिकथित तथ्य शाबीत झाले, तर कशा प्रकारे तो संबद्ध होईल असे न्यायाधीश पुरावा देऊ पाहाणाऱ्या पक्षकाराला विचारू शकेल व ते तथ्य शाबीत झाले तर तो पुरावा संबद्ध होईल असे न्यायाधीशाला वाटले तर न्यायाधीश तो पुरावा स्वीकृत करील, एरव्ही नाही.
२) जे शाबीत करावायाचे म्हणून पुढे मांषले आहे असे तथ्य हे जर अन्य एखाद्या तथ्याची शाबिती झाल्यावरच ज्याचा पुरावा स्वीकार्य होतो अशा स्वरूपाचे तथ्य असेल तेव्हा, प्रथम उल्लेखिलेल्या तथ्याचा पुरावा दिला जाण्यापूवी ते दुसरे तथ्य शाबीत करण्यात आले पाहिजे- मात्र लगतपूर्वी उल्लेख करण्यात आलेल्या तथ्यांचा पुरावा देण्याचे पक्षकाराने अभिवचन दिलेले असून अशा अभिवचनामुळे न्यायालयाचे समाधान झाले असेल तर गोष्ट वेगळी.
३) जर एका अभिकथित तथ्याची संबद्धता दुसरे अभिकथित तथ्य आधी शाबीत केले जाण्यावर अवलंबून असेल तर, न्यायाधीश स्वविवेकानुसार एकतर दुसरे तथ्य शाबीत होण्यापूर्वी पहिल्या तथ्याचा पुरावा दिला जाण्यास परवानगी देऊ शकेल, किंवा पहिल्या तथ्याचा पुरावा दिला जाण्यापूर्वी दुसऱ्या तथ्याचा पुरावा देणे आवश्यक करू शकेल.
उदाहरणे :
(a) क) जी व्यक्ती मृत असल्याचे अभिकथन करण्यात आले आहे तिने संबंद्ध तथ्यासंबंधी केलेले कथन शाबीत करण्याची सूचना आली असून ते कथन कलम ३२ खाली संबद्ध आहे. ते कथन शाबीत करु पाहणाऱ्या व्यक्तीने कथनाचा पुरावा देण्याआधी ती व्यक्ती मृत आहे हे तथ्य शाबीत केले पाहिजे.
(b) ख) जो दसतऐवज गहाळ झाल्याचे सांगण्यात आले आहे त्यातील मजकूर त्या दस्तऐवजाची प्रत हजर करु पाहणाऱ्या व्यक्तीने मूळलेख गहाळ झाला आहे हे तथ्य, प्रत हजर करण्यापूर्वी शाबीत केले पाहिजे.
(c) ग) एखादी मालमत्ता ही चोरीची आहे हे माहीत असताना ती स्वीकारल्याचा आरोप (ऐ) वर आहे ती मालमत्ता आपल्या कब्जात असल्याचे त्याने नाकबूल केले असे शाबीत करण्याची सूचना आली आहे. मालमत्ता तीच आहे किंवा काय यावर नाकबुलीची संबद्धता अवलंबून आहे. न्यायालय स्वविवेकानुसार एकतर कब्जाबाबतची नाकबुली शाबीत केली जाण्यापूर्वी मालमत्तेची ओळख पटवणे आवश्यक करु शकेल किंवा मालमत्तेची ओळख पटवली जाण्याआधी कब्जाबाबतची नाकबुली शाबीत करण्यास परवानगी देऊ शकेल.
(d) घ) (ऐ) हे तथ्य वादनिविष्ट तथ्याचे निमित्तकारण किंवा परिणाम असल्याचे सांगण्यात आलेले असून ते शाबीत करावयाची सूचना आली आहे. (बी, सी व डी) ही काही दरम्यानची तथ्ये असून (ऐ) हे तथ्य वादतथ्याचे निमित्तकारण किंवा परिणाम म्हणून मानले जाऊ शकण्यापूर्वी ती अस्तित्वात होती हे दाखवून दिले पाहिजे. न्यायालय एकतर (बी), (सी) किंवा (डी) शाबीत होण्यापूर्वी क शाबीत करण्यास परवानगी देऊ शकेल किंवा (ऐ) च्या शाबितीला परवानगी देण्यापूर्वी (बी), (सी) व (डी) हे शाबीत करणे आवश्यक करु शकेल.

Leave a Reply