भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम १३१ :
अपराध घडल्यासंबंधी माहिती :
कोणत्याही दंडाधिकाऱ्याला किंवा पोलीस अधिकाऱ्याला कोणताही अपराध घडल्याची कोणतीही माहिती कोठून मिळाली हे सांगण्याची त्याच्यावर सक्ती केली जाणार नाही व कोणत्याही महसूल अधिकाऱ्याला सार्वजनिक महसुली हितसंबंधाविरूद्ध कोणताही अपराध घडल्याची कोणतीही माहिती कोठून मिळाली हे सांगण्याची त्याच्यावर सक्ती केली जाणार नाही.
स्पष्टीकरण :
महसूल अधिकारी याचा अर्थ, सार्वजनिक महसुलाच्या कोणत्याही शाखेच्या कामांवर किंवा त्या संबंदात नेमलेला कोणताही अधिकारी असा आहे.