भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम १२८ :
वैवाहिक जीवनाच्या काळातील निवेदने :
जी व्यक्ती विवाहित आहे किंवा होती तिच्यावर, जी कोणतीही व्यक्ती तिच्याशी विवाहबद्ध झाली आहे किंवा होती तिने त्या पहिल्या व्यक्तीला वैवाहिक जीवनाच्या काळात केलेले कोणतेही निवेदन प्रकट करण्याची सक्ती केली जाणार नाही. तसेच विवाहित व्यक्तींमधील दावे किंवा एका विवाहित व्यक्तीने किंवा तिच्या हितसंबंधप्रतिनिधीने संमती दिल्याशिवाय ते निवेदन प्रकट करण्यास उपयुक्त पहिल्या व्यक्तीला परवानगी दिली जाणार नाही.