भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम १२६ :
विवक्षित प्रकरणांमध्ये साक्षीदार म्हणून पती-पत्नीची योग्यता :
१) सर्व दिवाणी कार्यवाहींमध्ये दाव्यातील पक्षकार व दाव्यातील कोणत्याही पक्षकाराचा पती किंवा पत्नी हे साक्षीदार होण्यास सक्षम असतील.
२) कोणत्याही व्यक्तीविरूद्ध चालेल्या फौजदारी कार्यवाहीत अशा व्यक्तीचा, प्रकारपरत्वे, पती किंवा पत्नी साक्षीदार होण्यास सक्षम असेल.