भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम १२५ :
शाब्दिक संवादास असमर्थ असलेले साक्षीदार :
जे साक्षीदार बोलू शकत नाहीत त्यांना लिहिणे किंवा खाणाकुणा करणे यासारख्या ज्या इतर कोणत्याही रीतीने आपली साक्ष आकलनीय करता येईल त्या रीतीने साक्ष देता येईल मात्र असे लिहिणे किंवा खाणाकुणा करणे या गोष्टी कुल्या न्यायालयात करण्यात आल्या पाहिजेत आणि अशा प्रकारे दिलेला साक्षीपुरावा हा तोंडी पुरावा असल्याचे मानण्यात येईल.
परंतु असे की, जर साक्षीदार शब्दिक संवादास असमर्थ असेल तर, न्यायालय निवेदन नोंदवून घेण्यासाठी दुभाषी किंवा विशेष शिक्षण देणारा याची मदत घेईल आणि असे निवेदनाचे दृकश्राव्य चित्रण (व्हिडिओग्राफ) करण्यात येईल.