Bsa कलम १२२ : भाडेकऱ्याला आणि कब्जाधारक व्यक्तीकडून परवाना मिळालेल्या व्यक्तींना प्रतिष्ठंभ :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम १२२ :
भाडेकऱ्याला आणि कब्जाधारक व्यक्तीकडून परवाना मिळालेल्या व्यक्तींना प्रतिष्ठंभ :
स्थावर मालमत्तेच्या भाडेकऱ्याच्या जमीनमालकाच्या अशा भाडेदारीच्या प्रारंभी अशा स्थावर मालमत्तेवर स्वत्वाधिकार होता ही गोष्ट, अशा भाडेकऱ्याला किंवा अशा भाडेकऱ्यामार्फ त दावा सांगणाऱ्या व्यक्तीला भाडेदारी चालू असताना किंवां त्या नंतर कोणत्याही वेळी नाकबूल करू दिली जाणार नाही. कोणत्याही स्थावर मालमत्तेच्या कब्जेदार व्यक्तीच्या अनुज्ञप्तीने त्या मालमत्तेच्या ठिकाणी आलेल्या कोणत्याही व्यक्तीला, अशी अनुज्ञप्ती देण्यात आली त्या वेळी अशा माल मालमत्तेचा कब्जा जिच्याकडे होता त्या व्यक्तीला अशा कब्जाबाबत स्वत्वाधिकार होता हे नाकबूल करू दिले जाणार नाही.

Leave a Reply