भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम १२० :
बलात्कारासंबंधीच्या विवक्षित खटल्यामध्ये संमतीच्या अभावासंबंधीचे गृहितक :
भारतीय न्याय संहिता २०२३ याचे कलम ६४, पोटकलम (२) खालील बलात्काराच्या खटल्यात, जेव्हा आरोपीने लैगिक संभोग घेतल्याचे शाबीत करण्यात आलेले असेल आणि ज्या स्त्रीवर बलात्कार करण्यात आल्याचे अभिकथन करण्यात आले असेल, त्या स्त्रीच्या संमतीवाचून तो संभोग झाला होता किंवा कसे असा प्रश्न उद्भवलेला असेल आणि आपण संमती दिली नव्हती असे तिने न्यायालयासमोरील आपल्या साक्षीपुराव्यात कथन केलेले असेल तेव्हा तिने संमती दिली नव्हती असे न्यायालय गृहीत धरील.
स्पष्टीकरण :
या कलमात लैगिक संभोग म्हणजे, भारतीय न्याय सहिता २०२३ याच्या कलम ६३ मध्ये नमूद केलेली कोणतीही कृती.