भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम ११६ :
वैवाहिक जीवनाच्या काळात जन्म हा औरसतेचा निर्णायक पुरावा :
कोणतीही व्यक्ती ही , आपली आई व कोणताही पुरूष यांच्या विधिग्राह्य वैवाहिक जीवनाच्या काळात किंवा त्या विवाहाच्या विच्छेदनानंतर आई अविवाहति राहिलेली असताना दोनशेऐंशी दिवसांच्या आत जन्मली होती हे तथ्य म्हणजे, ती व्यक्ती त्या पुरूषाचे औरस सपत्य (पुत्र-पुत्री) आहे याचा निर्णायक पुरावा असेल, मात्र ज्या वेळी ती व्यक्ती गर्भधारित होऊ शकली असती अशा कोणत्याही वेळी त्या विवाहित पक्षांना एकमेकांच्या बाबतीत समागमसंधी नव्हती हे दाखवून देता आले तर गोष्ट वेगळी.