Bsa कलम ११५ : विवक्षित (काही) अपराधांचे गृहितक :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम ११५ :
विवक्षित (काही) अपराधांचे गृहितक :
१) जेव्हा एखाद्या व्यक्तिने पोटकलम (२) मध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेला कोणताही अपराध :
(a) क) अनागोंदी नष्ट करण्यासाठी आणि सार्वजनिक सुव्यवस्था पुन्हा प्रस्थापित करुन ती टिकविण्यासाठी उपबंध करणाऱ्या, त्या त्या वेळी अमलात असलेल्या कोणत्याही अधिनियमितीअन्वये अशांत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेल्या कोणत्याही क्षेत्रात किंवा
(b) ख) जेथे एक महिन्यापेक्षा अधिक काळापर्यंत सार्वजनिक शांततेचा मोठ्या प्रमाणात भंग होत आहे अशा कोणत्याही क्षेत्रात, केला असल्याचा आरोप तिच्यावर असेल आणि कोणत्याही सशस्त्र सेनादलांतील किंवा सार्वजनिक सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सोपविण्यात आलेल्या अशा दलांतील सदस्य आपल्या कर्तव्याचे पालन करीत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी किंवा त्यांना प्रतिकार करण्यासाठी अशा क्षेत्रातील ज्या ठिकाणी किंवा ज्या ठिकाणामधून जेव्हा दारुगोळा, हत्यारे किंवा स्फोटक द्रव्ये वापरण्यात आली त्या ठिकाणी त्या वेळी अशी व्यक्ति होती असे दाखवून देण्यात येईल तेव्हा, जर विरुद्ध शाबीत करण्यात आले नाही तर, अशा व्यक्तिने अपराध केला आहे असे गृहीत धरण्यात येईल.
२) पोटकलम (१) मध्ये निर्दिष्ट केलेले अपराध पुढीलप्रमाणे आहेत, ते असे :
(a) क) भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १४७, कलम १४८ , कमल १४९ किंवा कलम १५० खालील अपराध;
(b) ख) भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १४९ किंवा १५० खालील अपराध करण्यासाठी फौजदारी (आपराधिक) कट किंवा तो अपराध करण्याचा प्रयत्न किंवा त्या अपराधास अपप्रेरणा.

Leave a Reply