Bsa कलम ११४ : कर्तव्यापेक्षी विश्वासस्थान असलेल्या दोन पक्षांतील व्यवहार सद्भावाची शाबिती :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम ११४ :
कर्तव्यापेक्षी विश्वासस्थान असलेल्या दोन पक्षांतील व्यवहार सद्भावाची शाबिती :
जेथे पक्षापक्षांतील संव्यवाहातील सद्भावाबाबतचा प्रश्न असून त्यांच्यापैकी एक पक्ष दुसऱ्याच्या कर्तव्यापेक्षी विश्वासाचे स्थान असतो तेथे, संव्यवहातील सद्भाव शाबीत करण्याची जबाबदारी कर्तव्यापेक्षी विश्वासाचे स्थान असलेल्या पक्षावर असते.
उदाहरणे :
(a) क) अशिलाने वकिलाला केलेल्या विक्रीमागील सद्भाव हा अशिलाने आणलेल्या दाव्यात प्रश्नास्पद आहे. संव्यवहारातील सद्भाव शाबीत करण्याची जबाबदारी वकिलावर आहे.
(b) ख) नुकत्याच सज्ञान झालेल्या मुलाने बापाला केलेल्या विक्रीतील सद्भाव हा मुलाने आणलेल्या दाव्यात प्रश्नास्पद आहे. संव्यवहारातील सद्भाव शाबीत करण्याची जबाबदारी बापावर आहे.

Leave a Reply